ज्या टीम च्या नावे ४ वर्ल्ड कप, ती टीम २०२३ च्या विश्वचषकात नाही खेळणार !! West Indies क्रिकेट टीमचा भारतामध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकात सहभाग नसणार !! होय, ऑक्टोबर २०२३ पासून भारतामध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडिज ची टीम खेळताना दिसणार नाही, कारण वेस्ट इंडिजची टीम पात्रता फेरीत च बाद झाली आहे. तीच वेस्ट इंडिज ची टीम जीने १९७५ चा पहिलं वहिला विश्वचषक जिंकला, १९७९ चा विश्वचषक ही जिंकला, २०१२ व २०१६ चा टी-२० चे विश्वचषक पटकावले. तीच वेस्ट इंडिज जीने Clive Lloyd, Viv Richards, Malcolm Marshall, Brian Lara, Shivnarine Chanderpaul, Chris Gayle, D J Bravo, Kieron Pollard सारखे दिग्गज क्रिकेट ला दिले ती टीम विश्वचषक मधून बाहेर पडली आहे. तर नक्की असे झाले कसे ? झिमबाबवे मध्ये होणाऱ्या २०२३ च्या वर्ल्ड कप क्वालिफायर्स मध्ये वेस्ट इंडिज च्या टीम ला, झिमबाबवे, नेदरलँड आणि स्कॉटलंड कडून पराभव स्वीकारावा लागला आणि या मुळेच भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकाचा मुख्य फेरीत वेस्ट इंडिज पोहोचू शकली नाही. वेस्ट इंडिज क्रिकेट टीम वर अशी वेळ नक्क...
Comments
Post a Comment